केबल तुटल्याने नारेगाव ११ तास काळोखात

Foto
छत्रपती संभाजीनगर, : गॅस (सांजवार्ता ब्युरो) पाइपलाइन टाकताना कंत्राटदाराने केलेल्या निष्काळजीपणाचा फटका नारेगाव परिसरातील ३५ हजार नागरिकांना बसला. आडव्या बोरिंगमुळे महावितरणची ११ केव्हीची भूमिगत केबल तुटली आणि संपूर्ण परिसर सलग ११ तास अंधारात गेला. यात महावितरणचे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
उत्तर प्रदेशातील कौसली येथील बीकेटी ट्रेडकॉम कंपनी नारेगाव रोडवरील ग्रामीण मंडळ कार्यालयासमोर गॅस पाइपलाइनचे काम करत होती. आवश्यक खबरदारी न घेता जमिनीखाली बोरिंग केल्याने केबल तुटली. जून महिना असूनही उन्हाचा चटका कायम असल्याने वीज खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या पथकांना मोठी धावपळ करावी लागली. त्याचवेळी संतप्त नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता अनिल जंगम यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा कर्मचारी रजनीश अनिरुद्ध पांडे व मशिनचालकाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions