नगरसोल-नर्सापूर एक्सप्रेस दोन तास उशिराने; प्रवाशांची गैरसोय

Foto

औरंगाबाद: तांत्रीक अडचणींमुळे नगरसोल-नर्सापूर एक्सप्रेस आज दोन तास उशिराने सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

नगरसोलहून नर्सापूरकडे जाणारी नगरसोल नर्सापूर एक्सप्रेस तांत्रीक अडचणींमुळे दोन तास उशिराने सोडण्यात आली.  त्यामुळे प्रवाशांना दोन तास ताटकळत बसावे लागले. अचानकपणे रेल्वे वेळापत्रकात बदल केला जातो. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही वळा तासन तास रेल्वेची वाट पहावी लागते. त्यामुळे रल्वे विभागाने किमान एक दिवस अगोदर संपुर्ण वेळेचा अंदाज घेऊन वळापत्रक जाहीर करावे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker