नाथसागराचे १८ दरवाजे उघडले : २८१३४ क्यूसेकने विसर्ग सुरू ...

Foto
पैठण, (प्रतिनिधी :  नाथ सागर जलाशय काठोकाठ भरल्याने मंगळवारी सायंकाळी जलाशयाचे १८ दरवाजे उघडून २८१३४ क्यूसेक वेगाने पाण्याचा  विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग करण्यात आला आहे. 

सकाळी नऊ वाजता नाथसागर जलाशयाची पाणी पातळी ९३.५४ टक्के होती आवक २८२९१ क्यूसेक सुरू होती सांडव्याद्वारे १९०२६, उजव्या कालव्यातून १००० तर डाव्या कालव्यातून ७०० क्यूसेकअसा विसर्ग करण्यात आला असून नदीकाठच्या सोळा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गोदावरी विकास महामंडळाचे संचालक जयंत गवळी, यांच्या हस्ते पूजन करून दरवाजे उघडण्यात आले. यावेळी
जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा  अभियंता रितेश भोजने, सहाय्यक अभियंता, अब्दुल गाझी, गणेश खरडकर, बाळासाहेब नजन, अरविंद थोरात, संजय चव्हाण, विठ्ठल पोकळे, विवेक वाघ, मंगेश सोलाट आधी आदींची उपस्थिती होती.