झांबड यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांचा उद्या रोड शो व जाहीर सभा

Foto

औरंगाबाद: लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचाराकरिता कॉंग्रेसचे स्टार प्रचारक माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू उद्या शनिवार दि. 20  शहरात येणार आहे. यावेळी श्रीहरी पवेलियन येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा त्यापूर्वी रोड शोचे  आयोजन करण्यात आले असल्याचे शहर जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे गर्दी खेचणाऱ्या नेत्यांच्या सभा घेण्यावर मोठ्या प्रमाणात विविध पक्षांनी जोर दिलेला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू उद्या शनिवारी शहरात येणार आहेत. यावेळी श्रीहरी पवेलियन येथे सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी त्यांचा रोड - शोचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुकुंदवाडी येथून या रोड शोला सुरुवात होईल पुढे आझाद चौक- रोशन गेट- सिटी चौक - गुलमंडी - क्रांतीचौक- उस्मानपुरा मार्गे श्रीहरी पवेलियन येथे या रोड शो चा समारोप होईल.  तेथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे.