"दहशतवादाला कुठलाही देश किंवा धर्म नसतो, त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा करा" हे विधान नवज्योतसिंग सिद्धू यांना चांगलेच महागात पडले आहे. नेटकऱ्यांच्या दबावापुढे झुकत सोनी टीव्ही ने सिद्धू यांची 'द कपिल शर्मा शो' मधून हकालपट्टी केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे या शो मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या जागी परीक्षक म्हणून आता अर्चना पूरण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती खुद्द अर्चना पुराण सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातुन दिली आहे.
जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शाहिद झाल्यानंतर देशभर संतापाची लाट आहे. अशातच नवज्योतसिंग सिद्दू यांनी दहशतवादाला कुठलाही देश किंवा धर्म नसतो. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा करा असे विधान केले होते. या विधानानंतर नवज्योतसिंग सिद्धू विरुद्ध सोशल मीडियावर संतापाची लाट पाहायला मिळाली. अनेकांनी 'द कपिल शर्मा शो' मधून सिद्धूची हकालपट्टी करावी अशी मागणी केली तर काहींनी 'द कपिल शर्मा शो'वर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. नेटीजन्सच्या या दबावापुढे सोनी टीव्ही ला अखेर झुकावे लागले असून द कपिल शर्मा शो मधून सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली आहे.