पैठण, (प्रतिनिधी): दक्षिण काशीतील जुन्या पैठण मधील प्राचीन नवनाथ गुफा मंदिरात चैत्र कृष्ण द्वितीया शुभ पर्वावर शनिवारी नवनाथ प्रगट दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भक्तांनी नवनाथ प्रतिमेवर पुष्पवष्टी करून नवनाथांचा जयजयकार केला. युवा कार्यकर्ता यश पळसकर यांच्या हस्ते नवनाथांचा अभिषेक पुरोहित वसंत पूर्णपात्रे यांच्या मंत्र उच्चारात करण्यात आला.
पैठण येथे नवनाथांनी जमिनीच्या आतील गुफेत तप साधना केल्याची लोकभावना असल्यामुळे नवनाथ भक्त दर्शनासाठी येथे येतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रतिश मगरे, रुद्राक्ष दाभाडे, बबलू हिंगे, वरूण कामाठी, योगेश भावसार, साहेबराव रोकडे, परमानंद दाभाडे, सुभाष घोडके, मधकर कलकर्णी. दीपक मस्के नाना दाभाडे. श्री नवनाथ इनामदार, सुभाष काळे आदींनी परिश्रम घेतले. गुफा मंदिर हे जीर्ण झाले आहे. या मंदिराचा जीर्णो द्वार खासदार संदिपान भुमरे आमदार विलास भुमरे यांच्या पुढाकाराने होत आहे.















