यंदा दहा टक्क्यांनी मागणी जास्त भगरचीही खरेदी वाढली
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगरः नवरात्र उत्सव म्हंटले की, देवीची आराधना केली जाते. त्यात मोठ्या प्रमाणात नागरिक नऊ दिवस उपवास करून देवीची पूजा करतात. दरवर्षी ही परंपरा जोपासली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात शाबुदाना, भगर खरेदीवर भर देतात. त्यासाठी किराणा विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर शाबुदाना, भगर विक्रीसाठी आणली जाते. ही पंरपरा यंदाही कायम ठेवली आहे. यावर्षी शहरात जवळपास दोनशे टन शाबुदाना विक्रीसाठी आणला गेला आहे.
यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी मागणी वाढली असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
नवरात्र उत्सव म्हंटले की, सर्वत्र उपवास करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे दरवर्षी
मोठ्या प्रमाणावर नवरात्रात शाबुदाना आणि भगर खरेदी होते. किराणा व्यापाऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणावर शाबुदाना आणि भगर विक्रीसाठी आणली जाते. यावर्षी खासकरून नवरात्र उत्सवासाठी व्यापारी वर्गाकडून जवळपास दोनशे टन शाबुदाना विक्रीसाठी आणला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मागणीही वाढली आहे. नवरात्र उत्सवासाठी खासकरून शाबुदाना खिचडी, शाबुदाना वडे तसेच भगरीचा भात याशिवाय शाबुदाना, भगरचे थालीपीठ, भगरीची भाकरी बनविण्यावर सर्वाधिक भर दिला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भगर आणि शाबुदाना खरेदी केला जातो. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत मागणीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी दोनशे टन शाबुदाना विक्रीसाठी आणला गेला आहे.
वीस टन भगर तर ५० टन शेंगदाणे आणले
शाबुदाना बरोबर भगर आणि शेंगदाणे खरेदीवर मोठ्या प्रमाणावर नवरात्र उत्सवात भर दिला जात आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस उपवास असल्याने प्रतिदिन मोठ्या प्रमाणात शाबुदाना आणि भगर खरेदीवर भर दिला जातो. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भगर, शेंगदाणे खरेदी केली जात आहे. त्यासाठी यंदा जवळपास वीस टन भगर विक्रीसाठी आणली गेली आहे. तसेच शेंगदाणे खरेदीतही यावर्षी वाढ झाली आहे. त्यासाठी व्यापारी आणि किराणा विक्रेत्यांनी यंदा जवळपास ५० टन शेंगदाणे विक्रीसाठी आणले गेले आहेत.
किंमतीत कुठल्याही प्रकारची वाढ नाहीः संजय कांकरिया
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शाबुदाना, भगर, शेंगदाणे खरेदीत वाढ झाली आहे. यावर्षी नवरात्रात दहा टक्क्यांनी मागणी वाढली आहे. मात्र शाबुदाना, भगर आणि शेंगदाणे याच्या किंमतीत कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच ग्राहकांना खरेदी करता येत आहे. यंदा शाबुदाना होल सेल दरात म्हणाल तर ६० ते ७० रुपये प्रति किलो विक्री होत असून रिटेल दरात ग्राहकांना ६५ ते ७५ रुपये प्रति किलो शाबुदाना खरेदी करता येत आहे.
तसेच भगरसाठी होल सेलमध्ये १०० ते १५० रुपये तर रिटेल साठी ग्राहकांना ११० ते १६० रुपये प्रति किलोसाठी मोजावे लागत आहे. तसेच शेंगदाणे साठी होल सेलसाठी १०० ते १५० तर रिटेल दरात ग्राहकांसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागत आहे. यावर्षी किंमती आहे त्याच आहेत. असेही जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी स्पष्ट केले.