वेळकाढूपणा करू नका; कोणतीही कारणे ऐकणार नाही : मजिप्राचे सदस्य सचिव रंगा नायक
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या पाणी योजनेचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, वेळकाढूपणा करू नका, कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक यांनी मंगळवारी (दि. २१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिले.
शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
गेल्या आठवड्यात मुंबईत घेतला होता. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी सूचना त्यांनी बैठकीत केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक हे शहरात आले आहेत. सोमवारी (दि.२०) त्यांनी जॅकवेल, जलशुद्धीकरण केंद्र, १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम, सिडको एन ५ येथील जलकुंभ यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी अधिकारी, कंत्राटदार कंपनीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त अमोल येडगे हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन
यापुढे सहन केले जाणार नाही !
▶ जलकुंभांची कामे सुरूच राहतील. या कामांमुळे पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले असे होऊ देऊ नका, यापूर्वी अनेकवेळा काम पूर्ण करण्यासाठी डेडलाइन दिली होती, पण ती पाळण्यात आली नाही. यापुढे हे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी बजावले. त्याबरोबरच ११०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरदेखील क्रॉस कनेक्शन करण्याचे आदेश रंगा नायक यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह अन्य अधिकारी बैठकीला हजर होते. सुमारे दोन तास ही बैठक सुरू होती. त्यात रंगा नायक यांनी
पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेत डिसेंबर अखेरपर्यंत योजनेचे पूर्ण क्षमतेचे काम कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले.












