पैठणमध्ये श्री कालिका देवी नवरात्र उत्सव नव्या समितीची घोषणा

Foto
पैठण, (प्रतिनिधी): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पैठण शहरातील रंगारहाट्टी गल्ली येथील प्रसिद्ध सर्वांचे आराध्य दैवत श्री कालिका देवी नवरात्र उत्सव २०२६ ची नवी महिला कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.

-यंदाचा नवरात्रोत्सव सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि विविध कला सांस्कृतिक उपक्रमांनी भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे. या वर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पुनम जैस्वाल तर उपाध्यक्षपदी पूजा असोलकर यांची निवड करण्यात आली आहे. 

मंडळाच्या इतर प्रमुख पदाधिकारी खालीलप्रमाणे : सचिवः अश्विनी ठोंबरे, सहसचिवः रंजीता दायमा, कोषाध्यक्षः श्रद्धा रावस सहकोषाध्यक्षः प्रीती कुलकर्णी, वैशाली खीस्ती, स्पर्धा प्रमुखः स्वाती साळुंके स्पर्धा उपाध्यक्षः कोमल तरटे, दांडिया प्रमुखः पायल ठोंबरे, कल्पना परागे, अश्विनी लोंढे, सुवर्णा सारडा, भारती जव्हेरी, संगीता आखेगावकर स्वागत प्रमुखः राणी गोजरे, संगीता चौधरी, स्वाती भारदे, अंकिता सराफ, स्वाती जाधव, छायाचित्र व प्रसिद्धी समितीः सीमा मुळे, पूजा सराफ, कल्पना बीचुकले, रुपाली मोदाणी, आरती नियोजन प्रमुखः राणी रावस, गीतांजली रावस, यामिनी सराफ यंदाच्या नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धा, आणि पारंपरिक गरबा - दांडियाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. 

श्री कालिका देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नवनिर्वाचित महिला समितीच्या वतीने केले आहे.