छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पैठण रोडवरील ढोरकीन येथे मंगळवारी (दि.७) सायंकाळी नवीन योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने चाचणी थांबविण्यात आली होती. त्यानंतर रात्री जायकवाडीतील जॅकवेलवरील पंपिंग थांबवून जलवाहिनी रिकामी करून घेण्यात आली. बुधवारी (दि.८) सकाळी केलेल्या पाहणीत जलवाहिनीवरील स्क्रोल व्हॉल्वचे वेल्डिंग निखळल्याचे दिसून आले. दुरुस्तीसाठी खड्डुचात जमा झालेले पाणी व गाळ काढण्याचे काम करण्यातच दिवस गेला. गुरुवारी वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे जलवाहिनीच्या चाचणीला पुन्हा दोन-तीन
दिवस ब्रेक लागला आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ३९ किमी
लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि जीव्हीपीआर कंपनीच्या वतीने २५०० मिमी व्यासाच्या या जलवाहिनीची चाचणी आणि स्वच्छतेचे काम सध्या सुरू आहे. चाचणीदरम्यान जायकवाडीचे पाणी शहरापासून अवघ्या २ किमी. लांब असलेल्या निसर्ग नर्सरीपर्यंत आणण्यात आले. त्याचदरम्यान ढोरकीन येथे जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाल्याने, जॅकवेलवरील पंपिंग बंद करण्यात आले. गळती मोठी असल्याने जलवाहिनीतील लाखो लिटर पाणी ढोरकीन गावाजवळील नदीपात्रातून वाहू लागले होते. हे पाणी पाहून नदीला ऐन उन्हाळ्यात पूर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. पंपिंग बंद केल्यानंतर जलवाहिनीचे दोन व्हॉल्व बंद करण्यात आले. या दोन व्हॉल्वमध्ये ६ किमी.
कौडगावनंतर दुसरी घटना
यापूर्वी कौडगाव येथील स्क्रोल व्हॉल्वला गळती लागल्याने चाचणी लांबवावी लागली होती. चाचणीदरम्यान १ एप्रिल रोजी जायकवाडीपासून निघालेले पाणी कौडगावपर्यंत आले होते. पाण्याने १९ किमीचा प्रवास पूर्ण केला होता. त्याचदरम्यान कौडगाव येथे व्हॉल्व्हचे वेल्डिंग निखळल्याने गळती लागली होती. हे काम करण्यासाठी तीन दिवस लागले. ४ एप्रिल रोजी पुन्हा पंपिंग सुरू करून चाचणीला सुरूवात करण्यात आली होती.
चे अंतर आहे. रात्री ही ६ किमी लांबीची जलवाहिनी रिकामी करून घेण्यात आली. व्हॉल्व्हची वेल्डिंग निखळल्याचे दिसून आल्यानंतर व्हॉल्व्ह परिसरात साचलेले पाणी, जमा झालेला गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत गाळ आणि पाणी काढण्याचे काम सुरु होते. गुरुवारी व्हॉल्व्हची वेल्डिंग करण्यात येईल. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे माती व गाळ पूर्णपणे बाजूला केल्यानंतरच समजेल. वेल्डिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची चाचणी पुढे सुरू करण्यात येईल. शुक्रवारी ही चाचणी सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.