सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 6 Date: 15/11/2026
गंभीर रुग्णांना एकाच छताखाली मिळणार अत्याधुनिक उपचार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गंभीर आजार, अपघात आणि वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांना तातडीने जीवनरक्षक उपचार मिळावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ५० खाटांचे अत्याधुनिक 'क्रिटिकल केअर युनिट' उभारण्यात येत आहे. या युनिटचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर असून, ते कार्यान्वित झाल्यानंतर घाटीची अतिगंभीर रुग्णांवरील उपचार क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना एकाच छताखाली अद्ययावत वैद्यकीय
सुविधा उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत या युनिटची घाटीत उभारणी करण्यात येत आहे. घाटीच्या मेडिसीन विभागासमोर या युनिटसाठी जागा निश्चित करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता बांधकामाला गती मिळत असून, स्वतंत्र क्रिटिकल केअर युनिटचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने काम सुरू आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी बांधकामाची
पाहणी करीत आढावा घेतला. या युनिटमध्ये ५० खाटांची व्यवस्था असणार आहे.
त्यासाठी व्हेंटिलेटरसह अन्य अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गंभीर रुग्णांना आवश्यक असलेल्या उपचार व्यवस्था एकाच ठिकाणी करण्याची सुविधा, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची प्रयत्न आहे. त्यामुळे अपघातग्रस्त, श्वसनाचा
५० खाटांची अतिरिक्त क्षमता
घाटीत आधीपासूनच मोठ्या संख्येने गंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अशा वेळी अतिदक्षता खाटांची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. नवीन क्रिटिकल केअर युनिट कार्यान्वित झाल्यानंतर गंभीर रुग्णांसाठी अतिरिक्त ५० खाटांची क्षमता उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णालयावरील उपचारांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
गंभीर त्रास असलेले तसेच अन्य जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












