श्री सिद्धिविनायक सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठणकरांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धिविनायक सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

असून मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक भूषण कावसानकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक भूषण कावसानकर, स्वागताध्यक्षपदी नगरसेवक सुनील रासने, तर सचिवपदी नगरसेवक जितू परदेशी तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी व पवन लोहिया आदींची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष किशोर चौहान यांनी दिली. 

या वेळी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, स्वदेश पांडे, उमेश तट्टू, बाळासाहेब मुंदडा, ज्ञानेश्वर दहीवाळ, दिपक आजा, बलराम लोळगे, सोमनाथ परळकर, अशोक कुंढारे, दिपक लखमले, सहसचिवपदी रामेश्वर सुसे, किशोर तावरे, शाम पंजवाणी, कोषाध्यक्षपदी ताराचंद शिंगवी, प्रमुख सल्लागार म्हणून नंदलाल काळे व सतीश लखोटिया, मूर्तिदाते कुणाल खताडे, भंडारादाते शिंगवी परिवार, प्रसिद्धी प्रमुख पैठण तालुका मराठी पत्रकार संघ, पैठण तालुका पत्रकार संघ, सहकार्याध्यक्षपदी दीपक लिखिते, एकनाथ चौके, किशोर शिंगवी, सोमनाथ भारतवाले, बाबासाहेब राऊत, दामोधर गरड, संस्कृतिक कार्यक्रम प्रमुख किरण गाडेकर, गणपत मिटकर, नरेश सिकची, रुपेश चौहान आदींची निवड करण्यात आली.

सहस्वागताध्यक्षपदी लालाजी मुंदडा, अमित दाभाडे, एकनाथ पटेल, डॉ. रमेश आर्ले, अभिजित काला, सिद्धार्थ परदेशी, निलेश परदेशी, ज्ञानेश्वर उगले तसेच मार्गदर्शक म्हणून विजय पापडीवाल, राजेंद्र सारडा, अनिल सराफ, राम आहुजा, तुषार पाटील, अरुण देऊळगावकर, सुनील बलदवा, डॉ. सुनील गायकवाड, जनार्दन मिटकर, सुनील नलभे आदींची निवड करण्यात आली. 

मंडळाचे सल्लागारपदी अशोक चांडक, मधु मुंदडा, प्रकाश कासलीवाल, प्रभाकर पोटे, निजामभाई नांदरवाले, अॅड. प्रितम साबू, सचिन उंडाळे, बाबूभाई टेलर आदीं सह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालिवाहन पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य असणार आहे.

या वेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष किशोर चौहान यांनी, व्यापारी, ग्रामस्थ व सर्वांच्या सहकार्यामुळेच समस्त पैठणकरांचे श्रद्धास्थान श्री सिद्धिविनायक सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळ हे २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार विलासबाप्पू भुमरे यांचे नेतृत्वाखाली तसेच सर्व संस्थापक सदस्य, नूतन पदाधिकारी, व्यापारी व सर्व पैठणकरांच्या सहभागाने या वर्षीचा गणेशोत्सव सोहळा हा शानदार देखावा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करणार असल्याचे त्यांनी संगितले. 

यावेळी मंडळाचे सदस्य असणारे नगराध्यक्ष, नगरसेवक व विविध सामाजिक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झालेल्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.