पैठण पंचायत समितीतील नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा सत्कार

Foto
पैठण, (प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा सत्कार सोहळा विविध ठिकाणी उत्साहात पार पडत आहे. 
पैठण पंचायत समितीच्या सौ. वैशाली विनोद बोंबले (सभापती) आणि संजय लघाने (उपसभापती) यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पंचायत समिती कार्यालय पैठण येथील सभापती दालनात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या सभापती व उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा
वर्षाव केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास साध्य होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

याप्रसंगी रेणुकादेवी सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन नंदकुमार पठाडे, संत एकनाथ साखर कारखाना माजी संचालक विजय गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे
तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघांचे संचालक अनिल हजारे, शाखा अभियंता आदिनाथ जायभाये, साखर कारखाना संचालक अक्षय पाटील, पिंटूपाटील तांबे, गणेश बोंबले, रोहित हजारे, लक्सण चव्हाण, सुनिल खरात यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.