सोयगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंबायतीच्या रामपूरा शेती शिवारातील गट नंबर १०६ मधील भरदिवसा एका झोपडीवर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात झोपडीत बांधलेली शेळी ठार झाली.
तर प्रसंगावधान राखून शेतकऱ्याने पळ काढल्याने शेतकऱ्याचा जीव मात्र वाचल्याची घटना काल (दि. २१) सायंकाळी ५ वाजता घडली आहे. मधुकर बन्सीलाल राठोड यांची ची रामपूरा शेती शिवारातील गट नंबर १०६ मधे शेती असून त शेत राखण करण्यासाठी त्यांनी झोपडी वजा गोठा बांधला आहे.
नेहमी प्रमाणे ते झोपडीत ते गोठ्यातील पाळीव ची शेळीला पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांच्या समोर क बिबट्याने शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात बकरी ठार पा झाली. हे पाहताच प्रसंगावधान राखून जिवाच्या भीतीने टे मधुकर राठोड यांनी झोपडीतून धूम ठोकल्याने त्यांचा जीव मात्र वाचला आहे.
वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे बर शेतकरी चिंतेत असतानाचा अश्या प्रकारे वन्य प्रण्यांकडून शेतकर्यांच्या पशुधनावर हल्ले होत असल्याने शेतकरी भयग्रस्त झाले आहे.















