ट्रक-टेंपो यांच्या धडकेत नाशिकचे नऊ भाविक जखमी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर - सिल्लोड महामार्गावर सोमवारी (ता. दोन) सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि छोट्या टेंपोची जोरदार धडक न झाली. या अपघातात टेंपोमधील महिला व बालकांसह नऊ भाविक जखमी झाले. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जखमी भाविक नाशिक आणि बिडकीन परिसरातील आहेत. 

सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील विघनवाडी आणि छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन येथील भाविक जालना जिल्ह्यातील जाळीच्या देवाच्या दर्शनासाठी गेले होते. सोमवारी न दर्शन आटोपून परतत असताना भाविकांनी भरलेला टेंपो (क्र. एमएच १२ एसएफ २७९३०) आणि ट्रक (क्र. सिल्लोडजवळ धडक झाली. 

घटकेची एमएच २० एचपी ६७८६) यांच्यात तीव्रता इतकी होती की, टेंपो रस्त्यावरच रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना उलटला. माहिती मिळताच दोन खासगी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. उमाकांत मारावर, डॉ. बिलाल देशमुख, परिचारिका मंगला दुधे आणि संतोष राजपूत यांनी तातडीने उपचार सुरू केले. याकामी सुरक्षा कर्मचारी पोपटराव कदम, कौतिक सुरडकर व सामाजिक कार्यकर्ते पंगा आरके यांनी मोलाचे सहकार्य केले.

-- जखमींमध्ये यांचा समावेश ----
या अपघातात प्रेम अंबादास शिंदे (वय १४), कांताबाई शामसुंदर गायके (वय ५५, बिडकीन), सायली दीपक साडकर (वय १३), संदीप श्रीधर साडकर (वय ३५), दीपक श्रीधर साडकर (वय ४५, विनवाडी ता. सिन्नर), वर्षा दीपक साडकर (वय ४०), शांताबाई सुभाष विधानस्कार (वय ६०, रा. शिंदपलासर, ता.नाशिक), प्रज्वल संदीप साडकर (वय ११), ठगुबाई श्रीधर साडकर (वय ६०, रा. विघनवाडी) यांच्यासह अन्य भाविक जखमी झाले.