निर्मोही आखाडा, मुस्लिम पक्षकार चर्चेस तयार; हिंदू महासभेचा विरोध, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राखीव

Foto
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या तासाभराच्या सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. मध्यस्थाच्या विषयावर प्रामुख्याने ही सुनावणी आयोजित करण्यात आली होती. निर्मोही आखाडा परिषद आणि मुस्लिम पक्षकारांनी चर्चेची तयारी दाखवली. परंतु, त्यास हिंदू महासभेचा विरोध केला. यानंतर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवत असल्याचे जारी केले.

 तत्पूर्वी 26 फेब्रुवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली मध्यस्थाच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर कोर्टाने सहमती दर्शवली होती. पण, मध्यस्थीच्या नावे अयोध्येचा वाद आणखी लांबवला जाईल. यापूर्वीही असे झाले आहे असा युक्तीवाद करत हिंदू महासभेने चर्चेला विरोध केला.गेल्या 70 वर्षांपासून राम मंदिराचा वाद कोर्टात अडकला आहे. हिंदू महासभेच्या पक्षकारांनी सांगितल्याप्रमाणे, यापूर्वी वादावर मध्यस्थीतून तोडगा काढण्याचे खूप वेळा प्रयत्न झाले. परंतु, ते सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहे. मध्यस्थीच्या नावाने यासंदर्भातील निकालास आणखी विलंब लागेल असा युक्तीवाद हिंदू महासभेने सादर केला. तर निर्मोही आखाडा परिषद आणि मुस्लिम पक्षकारांनी या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी जनहितार्थ होकार दर्शवला आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठात ही सुनावणी सुरू असून त्याचे नेतृत्व सर न्यायाधीश रंजन गोगोई करत आहेत. न्यायालयाने सर्वच पक्षकारांना मध्यस्थीसाठी प्रतिनिधीचे नाव सूचविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, आता या चर्चेसाठी एकापेक्षा अधिक मध्यस्थांची नियुक्ती होणार अशी चिन्हे आहे