भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

Foto
मुंबई : मूळ भारतीय वंशाच्या आणि मूळ दक्षिण आफ्रिकेतील नवनेथम 'नवी पिल्लईंना' यंदाचा नोबेल पीस प्राईज म्हणजेच शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे.  विशेष म्हणजे यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव चर्चेत होते. विशेष म्हणजे, त्यांनी स्वत: देखील आपणास शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, यंदाही डोनाल्ड ट्रम्प हे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मूळ भारतीय वंशाच्या आणि मूळ दक्षिण आफ्रिकेतील नवनेथम 'नवी पिल्लईंना' यंदाचा नोबेल पीस प्राईज म्हणजेच शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे. 

यंदाच्या शांतता नोबेल पुरस्कासाठी महिलेला सन्मानित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नोबेल समितीतर्फे शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नवनेथम 'नवी पिल्लईंना' 2026 चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यंदाच्या वर्षी 2026 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याच्या स्पर्धेत पोप लियो, इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट आणि फिलिस्तीनी क्षेत्रातील विशेष रैपोर्टेयर (विशेष प्रतिनिधि) प्रमुख दावेदार होते. यंदाचा 'नोबेल पीस प्राइज' आपल्यालाच मिळायला हवा, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळेच, पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी निवड समितीवर आक्षेप घेतला आहे. 

नवी पिल्लेई यांची कारकीर्द-
जन्म: 1941, दक्षिण आफ्रिका.
कायदे क्षेत्रातील सुरुवात: 1967 मध्ये त्या आपल्या प्रांतात वकिली करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक ठरल्या.
वर्णभेदाविरोधातील लढा: दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या काळात त्यांनी वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यांची बाजू मांडली आणि कैद्यांवरील अत्याचारांचे मुद्दे उपस्थित केले.
रवांडा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण: 1995 मध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1999 ते 2003 या काळात त्यांनी या न्यायाधिकरणाचे अध्यक्षपद भूषवले.
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय: 2003 मध्ये त्या न्यायाधीश म्हणून निवडल्या गेल्या.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त: 2008 ते 2014 या काळात त्यांनी हे महत्त्वाचे पद सांभाळले.

रसायनशास्त्राचा नोबेल जाहीर संयुक्त बहुमान
जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. यातील रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा बुधवारी करण्यात आली. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार फ्रान्सचे शास्त्रज्ञ हेन्री बी. कागन आणि जपानचे शास्त्रज्ञ केन्सो सोई यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. 'नॉन लिनियर इफेक्ट्स' आणि 'स्व-उत्प्रेरण' या क्षेत्रातील त्यांच्या क्रांतीकारी शोधासाठी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसकडून हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला आहे.