आता भाजप आमदार अतुल सावेंनी घेतली सिडको पाणीप्रश्नी उडी; आज आयुक्त व अधिकाऱ्यांसह बैठक

Foto

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडलेले आहे.यावरून नुकताच  भाजपा नगरसेवकाने आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिल्यानंतर पदाधिकारी,नगरसेवक व आयुक्त यांची बैठक पार पडली. यानंतर आता भाजपचे आमदार अतुल सावे यांनी यात उडी घेत याप्रश्नी बैठक घेण्यासंबंधी संबंधी सूचना केल्या.त्यानुसार आज शुक्रवारी पुन्हा या प्रश्न संबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  

गेल्या काही दिवसांपासून शहरातला पाण्याचा प्रश्न सातत्याने पेटत असून यावरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे देखील पाहायला मिळत आहे. शहरातील काही भागात  सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  विशेषतः सिडको-हडको भागात पाण्याची समस्या अधिक तीव्र आहेत. यावरून नुकतेच भाजपाचे पवन नगर येथील नगरसेवक नितीन चित्ते यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिला होता. यानंतर या प्रश्नासंबंधी भाजपचे किशनचंद तनवाणी, नगरसेवक, अधिकाऱ्यांसह आयुक्तांसोबत बैठक बोलाविण्यात आली होती. यानंतर आता भाजप आमदार अतुल सावे यांनीही या प्रश्नी उडी घेत  . आपल्या पूर्व मतदारसंघात असलेले सिडकोतील वॉर्डासाठी विशेष बोलावण्याच्या सूचना महापौरांना दिल्या. त्यानुसार आज शुक्रवारी संबधित वॉर्डातील नगरसेवक,पाणीपुरवठा विभागचे अधिकारी,मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्यासह सदरील प्रश्नावर दुपारी 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर  येथे   बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आमदार सावे हे शहरातील इतर वॉर्डा प्रमाणे  सिडकोतील या वॉर्डानाही समान पाणी मिळावे हा मुद्दा मांडणार असल्याचे समजते.