टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आता 'वॉच'

Foto
जिल्हाधिकाऱ्यांकडून सनियंत्रण समिती गठित; दरडोई २० लिटर प्रमाणाचा आधार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांत टँकरद्वारे करावयाच्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता, अचूकता राखण्यासाठी जिल्हास्तरीय पाणी टँकर सनियंत्रण व प्रत्यक्ष पाहणी समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी एका आदेशाद्वारे शुक्रवारी (दि.१६) ही समिती गठित केली.
राज्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे उद्भवणारी पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या टंचाई कालावधीसाठी संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वंकष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
लोकसंख्येनुसार पाण्याची गरज निश्चिती
पाणीपुरवठ्यासाठी टँकर मंजुरीपूर्वी संबंधित गावाची किंवा वाडी-वस्तीची प्रत्यक्ष लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याची गरज निश्चित करण्यात येईल. शासनाने ग्रामीण भागासाठी निर्धारित केलेल्या निकषांनुसार दरडोई दररोज २० लिटर पाणी या प्रमाणाचा आधार घेतला
प्रत्येक खेपेची होणार नोंद
पाणीपुरवठ्याच्या प्रमाणात पारदर्शकता राखण्यासाठी टँकरच्या खेपांची संख्या, टँकरची प्रत्यक्ष क्षमता आणि संबंधित गावाची पाण्याची गरज यांची सांगड घालून खेपा निश्चित करण्यात येतील. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रत्येक शासकीय अथवा खासगी अधिकृत टँकरवर जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसविले जाईल. जीपीएस लॉगमधील फेऱ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष निर्गमनस्थळावरून किंवा स्रोतावरून भरलेल्या पाण्याच्या नोंदी यांची पडताळणी केल्याशिवाय टँकरचे देयक अदा केले जाणार नाही. टँकर चालक तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे डिजिटल खेप नोंदवही असेल. टँकर गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांच्या सह्या घेऊन खेपेची नोंद करण्यात येईल.
जाईल. टंचाईग्रस्त भागातील पशुधनासाठी आवश्यक पाण्याची गरजही विचारात घेतली जाईल.
टँकरची मागणी करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करून अधिकृत ठराव मंजूर करणे आवश्यक आहे.
भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना आणि जलपुनर्भरणाच्या कामांचे नियोजनही करावे लागणार आहे. थोडक्यात ज्या ज्या गावात टँकरची आवश्यकता भासेल तेथे जलपुनर्भरणासाठी उपाययोजना राबवाव्या लागतील.
https://epaper.sanjwarta.in/Powered By Vrudhee Solutions