स्पाच्या नावाखाली अश्लील चाळे सिटीचौक पोलिसांची कारवाई

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हडको कॉर्नर परिसरातील एका स्पा सेंटरवर सिटीचौक पोलिसांनी छापा टाकून सुरू गैरप्रकाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापक महिलेसह तीन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ४ मे रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ७अॅपल हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील 'सेव्हन्थ सेन्स स्पा अॅण्ड ब्युटी सेंटर' मध्ये स्पाच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानंतर विशेष पथकाने स्पा सेंटरवर धाड टाकली. कारवाईदरम्यान
काऊंटरवर व्यवस्थापक सारीका मरळ आढळून आली. चौकशीमध्ये तिने स्पा सेंटरचा मालक सनी मनोरे असल्याचे सांगितले. पोलिसांनी स्पा सेंटरमधील खोल्यांची तपासणी केली असता चार महिला आढळून आल्या. तसेच स्पा चालविण्यासाठी आवश्यक असलेला परवानाही सादर करता आला नाही. पोलिसांनी बाहेर थांबलेल्या तीन ग्राहकांची चौकशी केली असता ते स्पासाठी आल्याचे समोर आले. संबंधित महिलांनी ग्राहकांकडून अश्लील वर्तन होत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी ग्राहकांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी सनी मनोरे, सारीका मरळ आणि इतरांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions