चोरट्या वाळू उपशाने अधिकृत टेंडरवाले आर्थिक संकटात

Foto
ठेकेदार टेंडर बंद करण्याच्या मार्गावर. प्रशासनाचे 
चोरट्या वाळू उपशाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष

पैठण, (प्रतिनिधी):  तालुक्यात सद्यस्थीतीत पाटेगाव व हिरडेपुरी या दोनच वाळूघाटांचा लिलाव झालेला आहे, मात्र पैठण, शेवगाव, गेवराई तालुक्यातील अनेक गावातून अवैध वाळूचा उपसा रात्रंदिवस सुरू आहे याकडे संबंधित तालुक्याचे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

पैठण तालुक्याच्या हद्दीत जुने पैठण, प्रतिष्ठान महाविद्यालय मागील चानकवाही निम्म बंधारा परिसर, मौलाना दर्गा परिसर, आयटीआय परिसर, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी शिवार, दादेगाव, नायगाव, मायगाव, आपेगाव, कुरणपिंप्री, नवगाव, तुळजापूर, आदडे उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपूरी तसेच शेवगाव तालुक्यातील मुंगी, गेवराई तालुक्यातील गुलज, बोरगाव, बाभूळगाव येथे रात्रंदिवस जेसीबीच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरु असल्याने आधिकृत वाळूचे टेंडर घेणार्याची मोठी आर्थिक अडवणूक होत आहे.

प्रशासनाने आधिकृत बाळूसाठे सुरु करताच तालुक्यातील सर्वच वाळूघाटावरुन मोठ्या प्रमाणात विनापरवना
वाळू उपसा होत आहे, या अनाधिकृत वाळू उपश्यास महसुलच्या आधिकार्यांसह मंडळ, आधिकार्यासह तलाठ्यांचा पाठबळ असल्याने दिवसा ढवळ्या गोदावरी ओडबडण्याचे काम है वाळूचोर करीतआहेत, अवैध वाळू उपसा सुरु असल्याने आधिकृत वाळूचे टेंडर घेणार्या ठेकेदारांची मोठी आर्थिक अडवणूक होत आहे. त्यामुळे आधिकृत लिलावाने वाळूपट्टा घ्यावाकी नाही? असा प्रश्न वाळू ठेकेदारांना पडला आहे, अनाधिकृत वाळू उपश्यावर प्रतिबंध करावा नसता अधिकृत वाळू पट्टे बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.