औरंगाबाद: अंजना नदीला आलेल्या पुरात दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा येथे घडली.या पैकी एका वनरक्षकांचा मृतदेह आढळून आला आहे तर एन डी आर एफ च्या जवाणाकडून दुसऱ्या वनरक्षकांची शोध मोहीम सुरू आहे. राहुल दामोदर जाधव असे मृतदेह आढळून आलेल्या वनरक्षकांचे नाव आहे. व अजय संतोष भोई असे बेपत्ता वनरक्षकांचे नाव आहे.
जाधव आणि भोई हे दोघेही प्रादेशिक वन विभाग कन्नड कार्यालय अंतर्गत वनरक्षक पदावर कार्यरत होते. चिकलठाण वन परिमंडळातील साळेगाव येथे जाधव कार्यरत होते तर भोई हे जैतखेडा येथे कार्यरत होते. काल कन्नड तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे अंजना नदीला पूर आले होते.ड्युटीवरून दोघेही रात्रीच्या सुमारास त्यांची दुचाकी क्र(एम एच १८ एबी४२९३) वरून घरी जात असताना भारंबा तांडा येथील पूल ओलांडत असताना दोघेही दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. आज सकाळी जाधव यांच मृतदेह आणि दुचाकी नदी पात्रात आढळून आली. अजूनही वनरक्षक अजय भोई हे बेपत्ता आहेत.एन डी आर एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. शोधकार्य सुरू आहे.