मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. देशातील राजकारण भयानक असून, भाजपला भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. मोदी नावाचा पत्ता सटकला की भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळेल, असे राज ठाकरे म्हणाले. या घाणेरड्या राजकारणामुळे देश कोणत्या दिशेने जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ठाकरेंच्या सेनेतील सहा खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातील या सर्व राजकीय घडामोडींवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत परखड मत मांडलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ङ्गआता भाजपाला जो त्रास होणार आहे, तो त्यांनी बघत राहावा, अशी परखड टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, देशातील राजकारण भयानक आहे. घाणेरडं आहे. याचा भविष्यात भाजपला त्रास होणारच आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. आताची कृती भविष्यात काय पायंडा पाडतो याचं भान राजकारण्यांना नसेल तर.. कुठे नेणार आहोत देश? असा सवाल विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून टीका केली आहे. नरेंद्र मोदी नावाचा एक पत्ता आहे, तो सटकला की पत्त्यांच्या बंगला पडणार, जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे. बाकीच्यांवर नाही. उद्या सत्ता गेल्यावर भाजपला असाच त्रास होईल. तेव्हा काय कराल. कुठेपर्यंत जायचं हे कळलं पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात आले होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर..
मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील एक आमदार फुटला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या परखड शैलीत भाष्य केलं. ऑपरेशन टायगरवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी फुटलेल्यांच्या जिव्हारी लागेल असं उत्तर दिलं. प्रश्न विकत घेणार्यांचा नाहीय, विकले जाणार्यांचा आहे. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर गिर्हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे. कुठल्या पद्धतीचं हे राजकारण सुरु आहे. मला वाटतं लोकांमध्ये या बद्दल प्रचंड संताप आहेफफ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
राजकारणात सत्ता येत असते आणि जात असते. पण शेवटी आपला महाराष्ट्र आणि देश आपण कुठे नेणार आहोत? सध्या महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, ते खूप भयानक आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.