वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदूरढोक येथील भरधाव हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील नांदूरढोक शिवारात घडली. जालिंदर एकनाथ गायधने वय ४१ वर्षे राहणार नांदूरढोक असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर अपघातात योगेश भाऊसाहेब बाजारे राहणार नांदूर ढोक हे जखमी झाले आहे.
घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जालिंदर व योगेश हे दोघे दुचाकीने शेतातून घरी जात असताना नांदूर ढोक शिवारात भरधाव हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही दुचाकीवरून खाली पडले तर जालिंदर हा हायवाच्या मागील चाकाखाली सापडला उपस्थितांनी दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे जालिंदर यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर अज्ञातांनी हायवा पेटून दिला. घटनेनंतर वीरगाव पोलिसांनी घटनाथळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामक दलाचे वाहन पोहचेपर्यंत वाहनाचे मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. प्रकरणात वीरगाव पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. मृत जालिंदर हा मोलमजुरी करायचा व कुटुंबाचा या गंगथडी भागात हायवाचा हैदोस, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष गंगथडी भागात हायवातून मुरूम, वाळू, माती कुठलीही रॉयलिटी न भरता सरार चोरटी वाहतूक सुरू आहे. हायवा चालक ओव्हरलोड वाहने भरधाव वेगाने चालवतात याकडे प्रशासनाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे हायवा चालकांचा गंगथडी भागात हैदोस सुरू आहे.
लाडगावच्या घटनेची पुनरावृत्ती :
नागरिक म्हणता हायवा चालक सुधारणारच नाही, याअगोदरही अशीच घटना लाडगाव येथे घडली होती. ज्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव गेला, दरम्यान त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हे चालक सुधारणारच नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
वेगावर नियंत्रण नाही, विभाग झोपेत :
वैजापूर शहरात काही दिवसात उसाचे टॅक्टर व हायवा अपघातात कारणीभूत ठरत आहेत. चालताना हायवा साक्षात यमदूत चालल्यासारखे वाटत आहे. थोडा जरी हायवाचा धक्का लागल्यास थेट चिरडण्याची भीती निर्माण झाली आहे. उसाची वाहतूक दोन दोन ट्रॉली लावून होत असल्याने व रात्रीच्या वेळेस उसाचे ट्रॅक्टर दिसत नसल्याने तालुक्यात आत्तापर्यंत तीन जणांची जीव गेले आहे. आरटीओ विभाग मात्र झोपेची सोंग घेऊन बसले आहे. उदरनिर्वाह करायचा. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई वडील असा परिवार आहे. तो घरात एकमेव कमवता व्यक्ती होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
















