वैजापूर : वैजापूर-गंगापूर मार्गावरील वरखेड फाट्याजवळ विरुद्ध मार्गाने येणार्या ट्रकने कारला समोरासमोर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, राहुल दिनकरआप्पा सोनवणे वय-32 असे अपघातात जागीच ठार झालेल्या भाविकांचे नाव आहे. मृत राहुलची पत्नी शीतल सोनवणे वय-25, आणि मित्र दत्तात्रय ढोले (सर्व राहणार अंदारसुल ता.येवला,) हे दोघेही गंभीर जखमी आहेत.
या अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, सोनवणे दाम्पत्य हे त्यांचे पारिवारिक मित्र ढोले यांच्या सह कार क्रमांक(एम.एच.42 ए.क्यू.0500) मध्ये देवदर्शनासाठी मढी येथे गेले होते. देववदर्शनाहून अंदारसुल येथे घरी जात असताना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील वरखेड फाटा येथे औरंगाबादच्या दिशेने येणार्या भरधाव मालवाहू ट्रक (क्र. एम.एच.04 इ.एल.0292) आणि कार चा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस आणि 108 रुग्णवाहिकेला पाचारण करीत जखमींना कार बाहेर काढले.मात्र कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. कार मध्ये सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. भीषण अपघात राहुल चा जागीच मृत्यू झाला होता. जखमी शीतल आणि दत्तात्रय ला 108 रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील उप-जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबादेत हलविण्यात आले. तेथे दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून ट्रक चालक स्वतःहून पोलीसाना शरण आला त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.