अॅपेरिक्षा उलटून एक ठार, आठ जण जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : आडूळ येथे समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने रिक्षाचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर रिक्षा रस्त्यावर उलटला. निवृत्ती खरात अॅपेरिक्षाचालकाचा यात रिक्षातील निवृत्ती कडूबा खरात (वय ७०, रा. गेवराई बु., ह.मु. मुंबई) यांचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला.

तर गंगाधर पांढरीनाथ आगळे (वय ६५), मालनबाई रावसाहेब आगळे (वय ७०), कासाबाई विनायक साबळे (वय ५०), राणी गणेश साबळे (वय ३०), शीतल गणेश साबळे (वय १०), बाबूराव शेषराव वाघ (वय ७२) आणि हरिचचंद्र मनोहर वाघ (वय ६४) यांच्यासह रिक्षाचालक जखमी झाला. वाहनावरील ताबा सुटून रिक्षा उलटल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. आठ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. तीन) दुपारी चारच्या सुमारास आडूळ-गेवराई बुद्रुक रस्त्यावरील आडूळ खुर्द शिवारात घडला. 

दिवाळीचा बाजार आटोपून काही प्रवासी गेवराई बुद्रुक येथे परतत होते. त्यांना घेऊन अॅपेरिक्षा (एमएच-२०, ई-९५६१) आडूळकडून गेवराई बुद्रुकच्या दिशेने जात होता. आडळ खुर्द शिवारात समोरून ट्रॅक्टर येत असताना त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. ही माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आले.