भरधाव बोलेरोच्या धडकेत एक ठार; एक जण गंभीर

Foto
लहान्याची वाडी फाटा परिसरातील घटना

फुलंब्री, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील लहान्याची वाडी फाटा परिसरात भरधाव बोलेरो जीपने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी लहान्याची वाडी फाटा येथे घडली.

 या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरिफ हबीब शेख (रा. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बोलोरोचालकाविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साबेर रजाक शहा (वय ३२, रा. मिसरवाडी, छत्रपती संभाजीनगर) हे सहकाऱ्यांसह दुचाकीने (एमएच-२०, एचएल-०२७७) सिल्लोड-छत्रपती संभाजीनगर मागनि जात होते. त्यांच्यासोबत आरिफ हबीब रोख (रा. सिल्लोड) व अविनाश लक्ष्मण गायकवाड (रा. मिसरवाडी) हे होते.

दुपारी लहान्याची वाडी फाटा येथे आले असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून बोलेरो जीपने (एमएच-३७. जी - ७७०७) जोरदार धडक दिली. यात आरिफ शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित जीपचालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. अपघातानंतर बोलेरोचालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.