गंगापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली

Foto
दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

अलिम चाऊस

गंगापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सध्या अनेक शेतकऱ्यांना शेतीची कामे, कर्जफेड आणि इतर आर्थिक गरजांसाठी तातडीने पैशांची आवश्यकता असल्याने ते कमी दरातही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. या परिस्थितीचा फायदा व्यापारी घेत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

कांद्याचे भाव आणखी वाढतील या अपेक्षेने साठवणूक करण्याची त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना मिळणारा दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने योग्य हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कांद्याचे उत्पादन चांगले झाले, पण बाजारात दर खूपच घसरले आहेत. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि औषधांचा खर्च वाढला आहे. तरीही मिळणारा भाव खर्चही भरून काढत नाही. पैशाची तातडीची गरज असल्यामुळे नाईलाजाने कांदा विकावा लागत आहे. शासनाने कांद्याला योग्य हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.  क्षमता अनेक शेतकऱ्यांकडे नसल्याने त्यांना नाईलाजाने कमी दरात माल विकावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याला
- अनिल भुसारे, शेतकरी