काम करणाऱ्यांचाच पक्षात होणार सन्मान ! जिल्हा प्रभारी खा. प्रीतम मुंडे यांचा इशारा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): भाजपसाठी तळमळीने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला सन्मान मिळवून देण्यासह पक्ष बळकट करण्यासाठी ताकदीने काम करा, असे आवाहन शनिवारी (दि. २५) माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कन्नड, वैजापूर, गंगापूर आणि संभाजीनगर पश्चिम या चार मतदार संघांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. पक्षाकडून त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा पश्चिम प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.
शहरातील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या पदाधकारी आढावा बैठकीत माजी खासदार मुंडे म्हणाल्या की, आपण दिलेल्या जबाबदारीनुसार पक्ष वाढीसाठी प्रचंड प्रयत्न करणार आहोत. यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील साथ
आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी सर्वांसोबत अल्पोपहार घेऊन चाय पे चर्चा केली. तसेच त्यांनी सर्वांचा परिचय करून घेतला. आगामी पक्ष निवडणुका, संघटन आणि आगामी काळातील पक्षाचे उपक्रम यासंदर्भात विचारमंथन केले. डॉ. मुंडे म्हणाल्या की, भाजपचे कार्यकर्ते तळमळीने आणि निः स्वार्थपणे काम करतात. या काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याला सन्मान मिळवून देण्यासाठी आपण काम करणार आहोत. सर्वांशी भेटून मला आनंद होत आहे. पक्षाने दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे.
प्रदेश भाजप आणि स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी देखील आपण काम करणार असल्याचा याप्रसंगी विश्वास त्यांनी कार्यकत्यांना दिला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions