सीमा उघडा, आम्हाला वाचवा... बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

Foto
नवी दिल्ली : बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान, संकटात सापडलेल्या बांगलादेशात अडकलेले हिंदू नागरिक दहशतवादापासून वाचण्यासाठी भारताला त्यांच्या सीमा उघडण्याची विनंती करत आहेत.

दरम्यान, निर्वासित बांगलादेश सनातन जागरण माचा नेते निहार हलदर यांच्या मदतीने, रंगपूर, चितगाव, ढाका आणि मैमनसिंग येथे राहणार्‍या हिंदू नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या लोकांनी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संवाद साधला.

बांगलादेशातील विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हादीचा मृत्यू झाल्यानंतर उसळेलला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या २,९०० घटना मागच्या काळात घडल्या आहेत.

या परिस्थितीत आता बांगलादेशमधील हिंदू भारताकडे मदतीचे आर्जव करत आहेत. हिंसक जमावापासून संरक्षण मिळवण्यासाठी भारताच्या सीमा उघडण्याची विनंती करण्यात येत आहे. कट्टरपंथी मानले जाणारे बागंलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान हे पुन्हा बांगलादेशमध्ये परतल्यानंतर त्यांना जो पाठिंबा मिळाला, त्यामुळे अल्पसंख्याकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण आहे. सनातन जागरण मंचाच्या एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार , बांगलादेशमध्ये २.५ कोटी हिंदू आहेत.

रंगपूर येथील एका ५२ वर्षीय रहिवासी म्हणाले की, त्यांच्या धर्मामुळे त्यांना सतत अपमान सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चालताना त्यांना ऐकू येणारे टोमणे लवकरच मॉब लिंचिंगमध्ये बदलू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक हिंदू म्हणतात की, ते अडकले आहेत आणि त्यांना कुठेही जायचे नाही. त्यांना अपमान सहन करावा लागत आहे कारण त्यांना दीपू आणि अमृत यांच्यासारखेच मारले जाईळ याची भीती आहे.
ढाक्यातील आणखी एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, दीपू दास यांच्या लिंचिंगमुळे भीती निर्माण झाली आहे, तर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे त्यांना आणखी चिंतेत टाकते. जर बीएनपी सत्तेत आली तर आपल्याला आणखी छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीनांची अवामी लीग ही आमची एकमेव रक्षक होती.