वॉशिंगटन : मध्य पूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्येयुद्धविरामाचा प्रयत्न सुरू असतानाच, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. ङ्गङ्घजर युद्धविरामाच्या अटी पाळल्या गेल्या नाहीत आणि होर्मुजची कोंडी फोडली नाही, तर इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल,ङ्घङ्घ अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणार्या निर्णायक बैठकीच्या अवघ्या काही तास आधी ही धमकी आल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ामचे सैन्य आरामात आहे, पण सज्ज आहे !
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकन सैन्याच्या तयारीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, युद्धविराम लागू झाला असला तरी आमचे सैनिक इराणच्या आजूबाजूलाच तैनात आहेत. त्यांनी आपला दारूगोळा पुन्हा भरून घेतला असून ते केवळ विजयाची प्रतीक्षा करत आहेत. जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर समझोता लागू होत नाही, तोपर्यंत आमचे सैन्य तिथून हलणार नाही. अमेरिका पुन्हा एकदा जागतिक पटलावर आक्रमकपणे परतली आहे.
पाकिस्तानमध्ये उद्या हायव्होल्टेज बैठक
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिना लॅविट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे ही महत्त्वाची बैठक होणार आहे. अमेरिकेतर्फे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत, तर इराणकडून संसदेचे अध्यक्ष गालिबफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
इराणचा उलटवार: अमेरिका आणि इस्रायलने विश्वासघात केला!
दुसरीकडे, इराणने अमेरिकेवर युद्धविरामाच्या तीन महत्त्वाच्या अटी तोडल्याचा आरोप केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, इस्रायलने बुधवारी बैरूतमध्ये केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे हा करार धोक्यात आला आहे. लेबनानवरील हल्ले थांबवणे ही कराराची अट होती. इराणने स्पष्ट केले आहे की, जर अशा प्रकारे हल्ले सुरू राहिले, तर ते युरेनियम नष्ट करणार नाहीत आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील निर्बंधही कायम ठेवतील.
होर्मुज सामुद्रधुनीचे महत्त्व काय?
होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. इराणने हा मार्ग रोखून धरल्याने जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवण्याची भीती आहे. ट्रम्प यांनी हा मार्ग त्वरित खुला करण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास लष्करी कारवाई अटळ असल्याचे संकेत दिले आहेत.