छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व देवगिरी औद्योगीक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा गुरुवार दि.५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
यात टोयोटा किर्लोस्कर मोटर, बीजी-ली-ईन इलेक्ट्रिकल्स लि.,औरंगाबाद अॅटो अॅसिलरी, लिभेर अप्लायसेंन्स इंडिया प्रा.लि. शेंद्रा, वार्नर इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेटलमन ऑटो प्रा.लि., रॅडिको एन व्ही डिस्टीलरीज महाराष्ट्र लि., युवान इलेक्ट्रीकल सिस्टीम प्रा.लि., रत्नप्रभा मोटर्स प्रा.लि., नेक्सलॅड कंन्सल्टींग एलएलपी, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि., एसएस कंट्रोल प्रा.लि., डिस्टील एज्युकेशन अॅड टेक्नॉलॉजी प्रा.लि. (एथर एनर्जी लि.), सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., श्री समर्थ प्लाय अशा विविध १६ आस्थापना कडून ८०० रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी, एसएससी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी लॉग इन होऊन अर्ज करावा. संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.













