संसद भवन परिसरात विरोधी पक्षातील खासदारांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

Foto
नवी दिल्ली : २० जुलै रोजी सीजेपीच्या आंदोलनाविरोधात करण्यात आलेल्या 'पोलीस कारवाई'च्या निषेधार्थ काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या 'मकर द्वार' येथे केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, सरकारला राजकारण करायचं होते - खरगे
विधेयकात परीक्षेतील सुधारणेबाबत कुठलीही ठोस उपाययोजना नाही. फक्त शिक्षेचा आकडा वाढवण्यात आला आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. पेपर फोडणारे सुटले आणि पेपर देणाऱ्यांना मारहाण झाली. विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी हे विधेयक सरकारने आणले. २०२४ मध्येच कठोर कायदा आणवा असा आग्रह मी धरला होता. परंतु त्यावेळी तुम्हाला राजकारण करायचे होते. विद्यार्थ्यांच्या एकीपुढे हे सरकार झुकले - मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा

राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मनुस्मृतीवरू केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला असून, सत्ताधारी आक्रमक झाले आहे. जे.पी. नड्डा यांनी खर्गे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.