स. भू. संस्थेच्या वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानविकासच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
सिल्लोड, (प्रतिनिधी) : वकृत्व, भाषण आयुष्यात अंगी असणे गरजेचे. वकृत्व असेल तर आयुष्या घडवायला मोठी मदत होत असल्याचे अनेक उदाहरणे आपण अनुभवली म्हणून आयुष्याला दिशा देणारे हे कौशल्य असल्याचे मत जिल्हाधिकारी स्वामी यांनी विद्यार्थी कौतुक प्रसंगी केले.
सरस्वती भुवन संस्थेच्या भव्य अशा वकृत्व स्पर्धेत भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयाच्या भक्ती जाधव, देवयानी शेजुळ, अनन्या पाटील यांनी वकृत्व स्पर्धेत स्वतंत्रता समानता बंधुता आणि न्याय भारतीय लोकशाहीचा आधार देशाप्रती माझे कर्तव्य या दोन विषयावर प्रत्येकी पाच मिनिटे मनोगत व्यक्त करत मुद्देसुद सादरीकरण करत मान्यवरांसह उपस्थितांची मने जिंकली.
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगपुरा परिसरातील संस्थेचे मुख्य कार्यालय परिसरात असलेल्या संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात ही स्पर्धा पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, श्रीरंग देशपांडे, सुनील देशपांडे, पुखराज बोरा, विवेक मिरगणे, उपप्राचार्य संजय गायकवाड, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, प्रा. प्रशांत अपसिंगेकर, बी. बी. भडगे, अनिलकुमार थोरात, विलास आग्रे रायभान जाधव, डॉ. संजय गायकवाड हजर होते. यशस्वी विद्यार्थिनीचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम. के देशमुख साहेब, माजी सभापती अशोकदादा गरूड, रमेश ठाकूर, राजीव मासरुळकर, राजेंद्र महाजन, दीपक सोनवणे आदींनी अभिनंदन केले.















