पैठण तहसिलमध्ये नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश

Foto
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश

पैठण, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगरचे नवीन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पैठण तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व विविध विभागाचे विभाग प्रमुख, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी आदींची आढावा बैठक घेऊन संबंधित विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांना नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रलंबित विविध प्रश्न मुदतीचे आत निकाली काढावेत असे निर्देश दिले.

पीजे पोर्टल, आपले सरकार पोर्टलवरील सर्व अर्ज विविध मुदतीत निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी साधना सप्ताह अंतर्गत आय गॉट कर्मयोगी अंतर्गत किमान चार तास प्रशिक्षण करण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लोकशाही दिनातील प्रकरण, शासकीय जागेवरील अतिक्रमण वरील घरे नियमित करणे, सर्वांसाठी घरे योजनेसाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देणे, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, संजय गांधी इंदिरा गांधी योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते, अर्धन्यायिक प्रकरणे, भोगवटादार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर, नैसर्गिक आपत्ती योजना, कलम १५५ प्रकरणे, भूमी संपादन कमी जास्त प्रकरणे, तुकडा बंदी कायदा व कार्य पद्धती, जनसंवाद, सोशल मीडिया, इ ऑफिस प्रणाली, संवाद शेतू, महसुली वसुली इत्यादी विषयाबाबत मुद्देशीर माहितीचाआढावा घेतला.

यावेळी त्यांनी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांनी आठवड्यातून दोन दिवस जनतेसाठी वेळ देण्याचा असून त्याबाबतचा फलक कार्यालयाबाहेर लावण्याचे निर्देश दिले. महसूल स्तरावर वाळूघाट शोधून मोफत वाळू वितरण बाबत नियोजन करण्याचे निर्दे श दिले. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी एक महिन्यावरील सर्व फेरफार नोंदी निर्णीत करणेचे तहसील स्तरावरील सर्व प्रकरणे तीन महिन्याच्या आत निकाली काढावेत. तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांनी काल मर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजी नगर, उप विभागीय
अधिकारी पैठण, फुलंब्री, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वन विभाग, पोलीस प्रशासन, कृषी विभाग, उपाधीक्षक भूमी अभिलेख, सहाय्यक दुय्यम निबंधक, तालुका क्रीडा अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक डीएमआयसी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, महसूल विभागाचे सर्व नायब तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, व तहसीलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.