सूर्यघर योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वीज वापरणारे ग्राहक बनू लागले वीजनिर्माते

Foto
मंडलातील ७१ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वाढती विजेची गरज आणि दरमहा येणाऱ्या वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी घरगुती ग्राहक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ७१ हजार ८७२ घरांच्या छतांवर २५२.२२ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून घरगुती ग्राहक केवळ वीज वापरणारे न राहता वीजनिर्मातेही बनू लागले आहेत.
योजना अतिशय उपायुक्त
66
३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी जवळपास मोफत वीज उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
पूर्वी घरांच्या छतांचा वापर प्रामुख्याने पाण्याच्या टाक्या किंवा अडगळीतले साहित्य ठेवण्यासाठी होत असे. आता याच छतांवर सौर पॅनेल उभारून वीजनिर्मिती केली जात आहे.
दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता
यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. सौरऊर्जेतून तयार होणारी वीज घरगुती वापरासाठी उपलब्ध होत असल्याने
पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व आणि वीजबिलाचा भार कमी करण्यास मदत होत आहे.
घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीद्वारे
घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस परिमंडलात वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ३६ हजार ४०७ ग्राहकांनी १२९.३८ मेगावॅट, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील २१ हजार ७९९ ग्राहकांनी ७५.२२ मेगावॅट तर जालना मंडलातील १३ हजार ६६६ ग्राहकांनी ४७.६१ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संच घरावर उभारले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions