जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पी. एम. मिन्नू यांची नियुक्तीनियुक्ती

Foto
जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पी. एम. मिन्नू यांची नियुक्तीनियुक्ती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंकित यांची नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्रू पी. एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी गुरुवार (दि.२) जारी केले.
अंकित हे कडक शिस्तीच े आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. १८ मार्च २०२५ रोजी जळगाव जिल्हा परिषद सीईओ पदावरून त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली होती. १९ मार्च २०२५ रोजी त्यांनी पदभार स्वीकारताच विविध प्रशासकीय सुधारणा राबवत कामकाजात गती आणली. महाराष्ट्र केडरचे (२०१९) आयएएस अधिकारी असलेल्या अंकित यांनी सेवाकर्मी प्लस या राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती. 
कोचिंग न लावता गाठले शिखर
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या मिन्नू पी. एम. यांनी पोलिस लिपिक म्हणून नोकरी केली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी कोणत्याही कोचिंगशिवाय, स्वअभ्यासाच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत देशात १५० वा क्रमांक मिळवला. मिन्नू यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजात अधिक वेग आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.