सिल्लोड, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधत पीएमश्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा केन्हाळा शाळेने एक जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या हेमंत डोमे, क्षिति जोग, सचिन खेडेकर दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या मराठी चित्रपटातील शाळा, आमची मराठी शाळा या गीताचे गायक बाल कलाकार हभप रोहित जाधव याचा गौरव सोहळा व गायन समारोह आयोजित केला. हा बाल कलाकार ह भ प रामेश्वर महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय निल्लोड फाटा येथे शैक्षणिक व आध्यात्मिक शिक्षणाचे धडे घेत आहे.
या बालकलाकाराची विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर भेट व भव्य सत्कार सोहळा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श प्राथमिक शाळा केन्हाळा या ठिकाणी मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा झाला, यावेळी हा भ प रामेश्वर महाराज यांनी मराठी शाळा ही आई असून आईला म्हणजे मराठी शाळेला आज वाचविले पाहिजे, या साठी समाजाने पुढे येऊन मराठी शाळा व मराठी भाषेचे संवर्धन करावे असे आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर यांनी मातृभाषेतच प्रभावी शिक्षण होते त्यासाठी मराठी भाषेचा प्रभावी वापर करून भाषा समृध्द करावी. यावेळी गट शिक्षणाधिकारी श्री रमेश ठाकूर, जेष्ठ शिक्षण अधिकारी राजू फुसे, मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन वाघ, उषाताई कृष्णा पांढरे, दत्ता कुडके, साबेर भाई, नामदेव पांढरे, कृष्णा पांढरे, हकीम पठाण, कैलास पांढरे, शिवाजी कुमावत, ज्ञानेश्वर विदयालयाचे मुख्याध्यापक कृष्णा जैवळ, डिगांबर पवार, अंकुश पवार, जगन पवार, शेख नाजेम, कलीम मिस्तरी, जनार्धन बोराडे, विलास देहाडे, भाऊसाहेब मैंद, अशोक मोरे व शालेय समिती उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानंदा राजपूत, रत्नकला इंगळे, वंदना साबळे, विभा मेश्राम, श्रीनिवास जाधव, महेंद्र सूर्यवंशी, रमेश पवार, संभाजी पाटील, तेजस क्षीरसागर, सुरेंद्र बबीरवाल, विद्या सरदार, स्वप्नजा पाटील, कविता तेली, सदानंदी दोडके, सुनीता निंभोरे, नासिर अहमद, शेख कलिमुद्दीन, जुबेर कुरेशी तहसीन शेख, मुकिता पठाण, शाजिया शेख, शाहीन परवीन, कमल पांढरे, गणेश शिंदे, अब्दुल वहाब, अतुल कासारे, संदीप सास्ते, विठ्ठल गोराडे, संतोष एंडोले संजय सोनकांबळे, प्रकाश शिंदे, बळीराम गाडेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन सोमनाथ राणे यांनी केले.















