औरंगाबाद – आमच्या खात्यात जमा होणाऱ्या १५ लाख रुपयातून भारतीय जनता पक्षासाठीचा (भाजप) निधी कापून घ्या, असे उत्तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाले आहे. देशातील सर्वात श्रीमंत पक्ष भाजपच्या निधी संकलनाचे काम स्वतः नरेंद्र मोदींनी हाती घेतले आहे. नरेंद्र मोदी ऍपवरुन भाजपसाठी निधी जमा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
पंतप्रधानांनी २३
ऑक्टोबरला ट्विट करुन त्यांच्या पक्षाला निधी देण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले
आहे, ‘तुम्ही नरेंद्र मोदी
मोबाईल ऍपवरुन भाजपसाठी ५ रुपये ते १००० रुपयांपर्यंत निधी देऊ शकता. तुमची मदत
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी असणार आहे.’
पंतप्रधान नरेंद्र
मोदींची ही मागणी नेटकऱ्यांसाठी खिल्लीचा विषय ठरली आहे. २०१४ लोकसभा निवडणूक
प्रचारात नरेंद्र मोदींनी विदेशातील काळेधन भारतात आणून प्रत्येक भारतीयाच्या
खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते, जे भारतीय प्रामाणिकपणे टॅक्स भरतात त्यांना १५ ते २० लाख रुपयांचे बक्षिस दिले जाऊ शकते. मोदी सत्तेत येऊन आता साडेचार वर्षे होत आली आहेत. मात्र विदेशातील काळेधन अजून भारतात आले नाही, आणि जनतेच्या खात्यात
धनही जमा झालेले नाही. त्यांच्या आश्वासनाची आठवण नेटकऱ्यांनी यावेळी मोदींना करुन दिली आहे. आधी आमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करा,
मग तुमच्या पक्षासाठी निधी देतो असे उत्तर नेटकऱ्यांनी पंतप्रधानांना दिले आहे.
पंतप्रधानांचे एका
विशिष्ट पक्षासाठी निधी संकलनाचे आवाहन हा नैतिक मुद्दाही उपस्थित झाला आहे.
सुप्रीम कोर्टातील ज्येष्ट वकील इंदिरा जयसिंग यांनी पंतप्रधानांच्या ट्विटला
रिट्विट करत विचारले आहे, की विद्यमान पंतप्रधानांनी एका पक्षासाठी निधी संकलनाचे
आवाहन करणे घटनात्मकरित्या योग्य आहे का ? यामुळे सरकार आणि पक्ष यांच्यातील सीमारेषा तर पुसली जात
नाही ना? असा सवाल जयसिंग यांनी
केला आहे.
एडीआर अहवालानुसार
२०१६-१७ या वर्षात भाजपचे उत्पन्न १०३४ कोटी रुपये
होते. या वर्षात ५३३.२७ कोटी रुपये त्यांना देणगी मिळाली आहे. एवढ्या श्रीमंत
पक्षाने जनतेपुढे हात पसरणे म्हणजे नीरव मोदीने लोन मागितल्या सारखे असल्याचे अतुल
खत्री यांनी ट्विट केले आहे.