१४ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या पाचोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : १४ वर्षांपासून चोरीच्या गुन्हातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पाचोड पोलिसांना यश आले आहे. पोलीस ठाणे पाचोड येथे सण २०१२ मध्ये फिर्यादी नामे डॉ ठोके यांनी मोटारसायकल चोरी बाबत तक्रार पाचोड पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली होती सदरील गुन्हातील २ आरोपी हे या पूर्वी अटक करण्यात आले होते. परंतु आरोपी नामे सोनेसिंग प्रेमसिंग टाक रा शिवाजी चौक जालना हा माघील १४ वर्षांपासून गुन्हा केल्या पासून फरार होता. त्याचा बऱ्याच वेळा शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता. दोन दिवस सदरील परिसरात मुक्काम केल्यानंतर

-- गोपनीय सदरील यशस्वी कामगिरी -- 
प्रकाश जाधव पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर. प्रशांत स्वामी अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, सुनील पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पैठण यांच्या मार्गदर्शन खाली सचिन पंडित सहायक पोलीस निरीक्षक पाचोड. संदीप जाधव. मनोज वैद्य व होमगार्ड गोविंद शेळके यांनी केली. सदरील आरोपी आपले अस्तित्व बदलून राहत होता.

२६ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी गुन्हे बैठकीमध्ये आरोपी शोध बाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रकाश जाधव पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर. प्रशांत स्वामी अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी आरोपी अटक बाबत विशेष पथक नेमणून कार्यवाही बाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी पाचोड सचिन पंडित यांनी एक पथक जालना येथे खाना केले होते.

अंमलदार संदीप जाधव यांना माहिती समजली की, सदरील आरोपी हा १० वर्षांपूर्वी परतूर भागात कामानिमित्त गेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गोपनीय अंमलदार संदीप जाधव. मनोज वैद्य होमगार्ड गोविंद शेळके असे परतूर भागात उपलब्ध माहिती आधारे आरोपीचा शोध घेतला, असता आरोपीने परतूर भागात सैराट २ ढाबा नावाने हॉटेल सुरु केल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरील ठिकाणी साध्या वेशात छापा मारला असता, आरोपी मिळून आला. त्यास पोलीस ठाणे येथे आणून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.