अधिकारी - कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
पैठण, (प्रतिनिधी): लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारती च्या शौचालयाचे चेंबर गेल्या अनेक दिवसापासून फुटलेले असल्याने स्वच्छतागृहाचे घाण पाणी रस्त्यावर पसरल्याने या परिसरात उग्र वास येत असून कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कामकाज करणे मुश्किल बनले आहे.
तोंडाला रुमाल बांधून त्यांच्यावर कामकाज करण्याची वेळ आली आहे याकडे गट विकास अधिकारी तसेच संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. स्वच्छताचे धडे गिरवणाऱ्या पंचायत समितीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून नवीन इमारतीच्या स्वच्छता ग्रहाचे चेंबर गेल्या अनेक दिवसापासून फुटले असल्याने पंचायत विभाग व आस्थापना विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उग्र वासामुळे काम करणे अवघड झाले आहे.
या संदर्भात अनेक वेळा या विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गट विकास अधिकारी मनोरा गायकवाड यांच्याकडे तक्रार केलेली असतानाही त्यांच्या तक्रारीकडे गट विकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केलेले दिसत आहे.
या उग्रवासामुळे कर्मचाऱ्यांच्या तसेच या भागात काम करणाऱ्या अधिकारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून अनेक कर्मचाऱ्यांना विविध आजार जडले असून सदरील चेंबरचे काम तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी अधिकारी कर्मचाऱ्याकडून केली जात आहे.
धक्का प्रकार म्हणजे या नवीन इमारतीवर वेलझाडेंनी वेढा घातलेला असतानाही याकडे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. खुलाशानंतर पुढील कारावाई करणार दरम्यान, डॉ. रोहन धोत्रे, अमोल विधाते, शितल
इंगळे - पगारे आणि रौफ ताहेरोद्दीन शेख यांच्याकडून तीन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांच्या खुलाशानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणाकडे रुग्णालयातील कर्मचारी तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.













