पैठणचे नगरसेवक हुस्नोद्दीन कटयारे यांनी घेतले दर्गाचे दर्शन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक हुस्नोद्दीन कटयारे यांनी शनिवारी (ता. १४) खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जरजरी जर बक्ष दर्याला भेट देत मनोभावे दर्शन घेतले. निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर त्यांनी दर्यात उपस्थित राहून दर्शन घेतल्याचे सांगितले.

यावेळी दर्गा कमिटीच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच दस्तारबंदी करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहेमद, कमिटी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, नगरसेवक मिर्झा अयाज बेग, हबीबोद्दीन मुजावर, अब्दुल सलाम, आदिल कटयारे, शेख गुफरान, अब्दुल जमशीद आदी उपस्थित होते. कटयारे हे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक असून सलग तिसऱ्यांदा निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या निवडीबद्दल दर्गा कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.