गुड आवाजाने पैठण तालुका हादरला

Foto
गुड आवाजाने पैठण तालुका हादरला 
नागरिकात भीती 

पैठण, (प्रतिनिधी)  ;  गूढ आवाजाने पैठण तालुका हादरला असून या गुढ आवाजाच्या भीतीमुळे नागरिकांची गाळण उडाली आहे. पैठण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी,  गोदावरी नदीला आलेला महापूर या धक्क्यातून पैठण तालुक्यातील शेतकरी व पैठण शहरातील नागरिक सावरत नाही तोच आज दुपारी २: ४४ वाजता  पैठण तालुक्यातील अनेक गावात गूढ आवाज झाल्याने दरवाजे खिडक्या थरथर हादरल्या.

या आवाजाने जमीन हादरली असल्याने दुपारी झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे झाले. दरम्यान या आवाजाची मालिका गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र नेमका हा गुढ आवाज कशाचा आहे याचा मात्र शोध लागला नाही.