पैठणच्या नाथ दिंडीतील ६ हजार वारकऱ्यांवर उपचार

Foto
रेड स्वस्तिक सोसायटीचा सेवाभावी उपक्रम

पैठण, (प्रतिनिधी) :  शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पैठण ते पंढरपूर आषाढी दिंडी सोबत पायी मार्गक्रमण करणाऱ्या ६ हजार वारकऱ्यांवर १२ दिवसांत औषधोपचार करण्यात आले. रेड स्वस्तिक सोसायटी (शाखा छत्रपती संभाजीनगर) च्या वतीने गेल्या १७ वर्षापासून आरोग्य सेवेचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पैठण येथून दि. ७रोजी संत एकनाथ महाराज आषाढी पायी दिंडी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान केले. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील १२ गावांमध्ये मुक्काम करत पंढरपुरकडे निघाली आहे.

या पालखी सोहळ्यात समाविष्ट झालेल्या हजारो वारकऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील रेड स्वस्तिक सोसायटी मार्फत मागील १७वर्षांपासून अविरत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. यावर्षी रेड स्वस्तिक सोसायटीच्या
वतीने पालखी प्रस्थानाच्या दिवसापासून २० जुलै पर्यंत पर्यंत ६ हजार वारकऱ्यांना सर्दी, पडसे, गुडघेदुखी, खोकला व सांधेदुखी कोळी समाजातर्फे आरोग्य सेवा आदी आजारांवर औषधी वाटप करण्यात आले. वयोवृद्ध वारकऱ्यांवर उपचार व तपासणी करण्यात आली.

एकुण ९ लाख रुपयांची मेडिकल सोबत घेण्यात आली आहे. रेड स्वस्तिक सोसायटीचे स्वयंसेवक स्वतः वारकऱ्यांच्या पायाला मसाज करताना दिसून आले. रेड स्वस्तिकचे डॉ. अभिजित सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सदस्य के. डी. देशमुख, समन्वयक गणेश कुलकर्णी, विजय पवार, डॉ. मंगेश सपकाळ, डॉ. अमोल हिवाळे, काजल पवार, आदिती गव्हाळे, कबीर वाघमारे, प्रज्वल धारकर, अरमान बहाद्रे, साद देशमुख, अभिषेक मते, अथर्व मालकर, महेश सरवदे, सीए झंवर व दत्ता आडे आदींच्या आरोग्य पथकाने वारकऱ्यांची सेवा केली. 

ही सेवा अविरतपणे पंढरपूर पर्यंत पैठण तालुका महादेव कोळी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड हे गेल्या १६ वर्षांपासून नाथदिंडी पायी सोहळ्यात विनामूल्य आरोग्य सेवा देत आहेत. माजी आमदार रमेश पाटील यांच्या आर्थिक सहकार्याने स्वतंत्र शासनाद्वारे वारकऱ्यांना औषधी वाटप केले जाते. यंदा ७० हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या गोळ्या, औषधी व वेदनाशामक मलम यांचे वाटप केले आहे. 

या आरोग्य सेवेत लक्ष्मण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी मंगेश सपकाळ, पत्रकार बद्रीनाथ खंडागळे, ज्ञानेश्वर बोरुडे व चालक रामदास पवार हे कार्यरत आहेत. चालू राहणार आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित सपकाळ यांनी दिली.