शरणापूर परिसरात दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : शेरणापुर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे कमी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शरणापूर येथे सोमवारी महसूल, कृषी व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संयुक्त पंचनामे करण्यात आले. 

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एस. एम. लोंढे, महसूल अधिकारी रेश्मी पवार, कृषी सहाय्यक ज्योती चितळे, ग्रामपंचायत लिपिक आर. के. साठे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण कान्हेरे, महाळिग सदावर्ते, तलाठी आर. के. पवार व जे. बी. चितळकर यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. 

पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण व झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन संयुक्त पंचनामे करण्यात आले. या पाहणीदरम्यान शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.