दानवे-खोतकर वादात पंकजांची मध्यस्थी; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक

Foto
 भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा वाद मिटवण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आज मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. अर्जुन खोतकरही त्यांच्या समवेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या चर्चा करणार आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारच या भूमिकेवर अर्जुन खोतकर अद्यापही ठाम आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जालन्यात येऊन खोतकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर या दोघांमधील वाद निवळल्याचे जाहीरही करण्यात आले. मात्र लगेचच खोतकर यांनी आपण माघार घेतली नसल्याचे स्पष्ट करीत वाद अद्यापही कायम असल्याचे सांगितले. गेल्या दोन आठवड्यांपासून खोतकर यांना समजावण्याचे मोठे प्रयत्न भाजप धुरीणांकडून होत आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत आमदार अब्दुल सत्तार आणि खोतकर यांच्यात गुप्त बैठक झाली. त्या बैठकीनंतर सत्तार यांनी दोन दिवसात गोड बातमी कळेल असे सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे अर्जुन खोतकर आता थेट पंजा निशाणीवरच जालन्यातून लढणार असे बोलले जाऊ लागले. दरम्यान, आज दुपारी बाराच्या सुमारास ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे मंत्री खोतकर यांच्यासह मातोश्रीवर पोहोचल्या.  दानवे -खोतकर वादात पंकजा यांची मध्यस्थी किती यशस्वी ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker