पैठण, (प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील पप्पू भोले याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ५ मे रोजी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. परंतु ही आत्महत्या नसून घातपात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रणव भोले यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रणव भोले याने आत्महत्या केली नसून प्रेम प्रकरणातून हा खून करण्यात आला असल्याची माहिती प्रणव भोले यांच्या नातेवाईक असलेल्या लता गौतम निसर्गे व त्याचा मुलगा याच्या सांगण्यावरून मृत प्रणव पप्पू भोले याचे गावातील एका आंतरजातीय मुलीवर प्रेम संबंध होते. याच कारणावरून मुलीच्या आईने सकाळी प्रणव याच्या घरी जाऊन धमकावल्याने तसेच मुलीने मृत प्रणव यास दिलेल्या चिट्ठी सापडल्यावरून हि आत्महत्या नसून आत्महत्याचा बनाव करण्यात आला आहे.
-- अंत्यविधीसाठी पोलीस अधिकाऱ्याने धमकावले --
मयत प्रणव भोले याचे शव, शव विच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी शव विच्छेदन केल्यानंतर प्रणव भोले याच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने लवकर अंत्यसंस्कार न केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली होती.
पोलिसा अधिकाऱ्याच्या धमकीमुळे प्रणव याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने प्रणव यांच्या नातेवाईकांना धमकी दिली होती याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या नातेवाईकांची तक्रार न घेता त्यांना माघारी पाठवण्यात आले. तक्रार घेण्यास टाळळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची ही चौकशी झाली पाहिजे. प्रणवने आत्महत्या केली नसून त्याचा घात करण्यात आला आहे.
संशयास्पद असलेल्या या आत्महत्येची सखोल चौकशी करून प्रणव भोले यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्दे श एमआयडीसी पोलिसांना द्यावे नसता प्रणव भोले यांच्या कुटुंबातर्फे व वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड रामेश्वर तायडे, मुंजा तूपसमिंद्रे, रामदास वाघमारे, सुरज मुळे, सोमनाथ निकाळजे, बीए खाडे, दत्ता वाहुळे, भीमराज बोर्डे, शेषराव निकाळजे आदींनी केली आहे.












