मनपाच्या रखडलेल्या १५० विकासकामांचा मार्ग मोकळा·

Foto
आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : प्रभागात विकासकामे मंजूर करण्यासाठी किमान ८० टक्के मालमत्ता कर वसुली बंधनकारक करण्याचा महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. या जाचक अटीमुळे शहराभरातील १५० हून अधिक विकासकामे रखडली होती. यामध्ये ड्रेनेजसारख्या अत्यावश्यक कामांचाही खोळंबा झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. नागरिकांची वाढती नाराजी पाहता प्रशासनाने अखेर नमते घेत अत्यावश्यक कामांना या अटीतून वगळले आहे. त्यामुळे आता मराठवाडा
काही कामे अंतिम टप्प्यात
66 नगरसेवकांनी आवश्यक असलेली कामेच सुचविली आहेत. या कामांसाठी असलेली मालमत्ता कराची अट शिथिल केल्यानंतर आता बहुतांश कामे मार्गी लागत आहेत. काही कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत, त्यामुळे आचारसंहिता संपताच कामांचा मार्ग मोकळा होईल.
समीर राजूरकर, महापौर
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडताच या रखडलेल्या १५० कामांची निविदा प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ड्रेनेजच्या कामांसोबतच रस्त्यांच्या कामांनादेखील या अटीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार
रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. रस्त्यांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्याला प्रशासकीय पातळीवर मंजुरी घेतली जात आहे. २३ ऑक्टोबरनंतर आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून ही कामे अंतिम होतील. यासंदर्भात सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार चर्चा झाल्यानंतर, प्रत्येक विकासकामाची फाइल मंजूर करताना त्या भागातील नागरिकांनी ८० टक्के कर भरलेला आहे का, याचा अभिप्राय वॉर्ड कार्यालयांकडून घेतला जात होता. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी ८० टक्क्यांची अट ड्रेनेजच्या कामांसाठी वगळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी सध्या पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर सुमारे १५० कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions.