उपजिल्हा रुग्णालयात चुकीची औषधी दिल्याचा आरोप
गंगापूर (प्रतिनिधी) , रुग्णालयात उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे डॉक्टरांकडून रुग्णांना चुकीची तसेच मुदत संपलेली औषधे दिली जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या कथित प्रकारांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत असून, सर्वसामान्य नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेला कोणते इंजेक्शन दिले याची स्पष्ट माहिती न देता उपचार करण्यात आले. त्या इंजेक्शनचा तीव्र रिएक्शन संपूर्ण अंगावर झाल्याने संबंधित महिलेची प्रकृती अधिक या संपूर्ण प्रकरणाकडे आरोग्य प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्ण समिती सदस्यांकडून करण्यात येत आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. याबाबत आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अतुल रासकर, रुग्ण समिती सदस्य
बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रुग्णालयात रुग्णांना २५ तारखेनंतरही मुदत संपलेली औषधे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या औषधांमुळे काही रुग्णांना त्रास झाल्याचे सांगण्यात येत असून, याबाबत तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रुग्णालयात रुग्ण आल्यावर वेळेवर उपचार व आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याचेही आरोप समोर आले आहेत. डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.












