‘व्हॅलेंटाईन डे’ नंतर पवार, फडणवीस एका व्यासपीठावर

Foto
मुंबई । राज्यात भाजप लोकसभेच्या ४३ जागा जिंकणार आणि ती वाढलेली ४३ वी जागा बारामतीची असेल, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले होते. 

या पार्श्‍वभूमीवर सामाजिक न्याय विभागाने ‘व्हॅलेंटाईन डे’ नंतर येत्या १५ फेब्रुवारीला बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार आहेत.